सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे शिरगांव शाखा व्यवस्थापक मंगेश तळवडेकर यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे शिरगांव शाखा व्यवस्थापक मंगेश तळवडेकर यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे शिरगांव शाखा व्यवस्थापक मंगेश तळवडेकर यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा*

*शिरगाव : संतोष साळसकर*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शिरगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक मंगेश तळवडेकर यांना सेवानिवृत्ती निमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
मंगेश तळवडेकर यांनी शिरगाव येथे दोन वर्षे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत राहून ग्राहकांना उत्कृष्टरित्या व प्रामाणिकपणे सेवा दिली. नियत वयोमानानुसार ते ५८ व्या वर्षी सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ग्राहक व सहकाऱ्यांमध्ये ते विशेष लोकप्रिय ठरले.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजपा युवा मोर्चाचे देवगड तालुकाध्यक्ष अमित साटम, भाजपा देवगड तालुका माजी अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, शिरगाव सोसायटीचे चेअरमन मंगेश लोके, शिरगाव उपसरपंच संतोष फाटक, साळशीचे माजी सरपंच वैभव साळसकर, तोरसोळे सोसायटीचे चेअरमन अरविंद पवार, सतीश धरणे, नितीन घाडी, विनोद सरफरे, दिनेश लोके, कृष्णकुमार चव्हाण तसेच बँकेचे कर्मचारी बापू शेळके, मंगेश नार्वेकर, सुनील मगदूम, विजय दाभोळकर, हेमंत काणेरकर, दिपाली घाडी, प्रेरणा साटम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!