नगरपरिषद आणि नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ६ रोजी*

नगरपरिषद आणि नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ६ रोजी*

*कोंकण एक्सप्रेस*

*नगरपरिषद आणि नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ६ रोजी*

सिधुदुर्गनगरी ४राज्यातील नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत ६ ऑक्टोंबर रोजी मंत्रालय मुंबई येथे काढण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नगरपंचायतीसह राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षणकाढण्यात येणार आहे

राज्यात नगरपंचायत नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाचू लागले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत या सर्व निवडणुका पूर्ण करण्याच्या आदेशानुसार राज्यात सर्वप्रथम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर त्यानंतर नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषदपंचायत समिती तर त्याबरोबर नगरपंचायत परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्या धर्तीवर हे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे
राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत सोमवार, दि.०६.१०.२०२५ रोजी, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी, सुरक्षिततेच्या कारणास्तव मंत्रालयीन प्रवेशाची स्थिती विचारात घेता, सदर आरक्षणाच्या सोडतीसाठी आपल्या पक्षांचे दोन प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात येत असून, पक्षाच्या अध्यक्ष / सचिव यांनी दोन प्रतिनिधी यांची शिफारस करुन आरक्षणाच्या सोडतीसाठी पाठवावे, असे प्रियांका कुलकर्णी-छापवाले) शासनाच्या उप सचिव यांनी एका आदेशाने कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!