*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत तालुकास्तरीय भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धा संपन्न*
*कनेडी- वार्ताहर*
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत तालुकास्तरीय भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धेचे आयोजन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने १९८० मध्ये सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, जो शाळांमधून लोकसंख्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्या विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी चालवला जातो. या प्रकल्पांतर्गत किशोरवयीन आरोग्य, लैंगिक समानता, मादक पदार्थांचे सेवन आणि पर्यावरणीय विचार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आधारित उपक्रम राबविले जातात.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई चे सरचिटणीस श्री.शिवाजी सावंत साहेब यांनी भुषविले. प्रशालेच्या वतीने सर्व मान्यवरांचे व सहभागी संघांचे स्वागत करण्यात आले. पंचायत समिती, गट साधन केंद्र, कणकवली समन्वयक श्री.सचिन तांबे, विषय तज्ञ यांनी सर्व सहभागी संघांना भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धा या विषयी मार्गदर्शन केले. सर्व सहभागी संघांनी दर्जेदार सादरीकरण करत, प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीम. पल्लवी हाटले मॅडम, मराठी विषय तज्ञ, माध्यमिक विद्या मंदिर कनेडी, सौ.साधना न्हिवेकर मॅडम, हिंदी विषय तज्ञ, माध्यमिक विद्या मंदिर कनेडी. तसेच सौ. स्नेहल तांबे मॅडम, घोणसरी हायस्कूल यांनी काम पाहिले.
*स्पर्धेचा अंतिम निकाल*
*प्रथम क्रमांक*- एस.एम. हायस्कूल, कणकवली.
विषय- लोक नृत्य पर्यावरण संरक्षण, *द्वितीय क्रमांक* – शेठ न.म. विद्यालय, खारेपाटण. विषय- भावनिक आरोग्य मानसिक स्वास्थ,
*तृतीय क्रमांक*- कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली. विषय- लोक नृत्य- फुगडी पोष्टिक आहार या विषयांवर उत्कृष्ट सादरीकरण केले. प्रथम तीन क्रमांक यांना सन्मान चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन श्री.आर.एच.सावंत, सदस्य श्री.बावतीस घोन्सालवीस, श्री.संतोष सावंत, श्री.नागेश सावंत आदी मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, बहारदार सूत्रसंचालन श्री.प्रशांत माने तर आभार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण यांनी मानले.

