मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडे हायस्कूलचे वर्चस्व

मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडे हायस्कूलचे वर्चस्व

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत शिरवंडे हायस्कूलचे वर्चस्व*

मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे च्या भव्य पटांगणावर नुकत्याच पटांगणावर नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये मालवण तालुक्यातील 28शाळांमधील सुमारे 450 स्पर्धेकांनी सहभाग घेतला. यजमान त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे प्रशालेच्या 24स्पर्धकांनी विविध प्रकारात सहभाग घेतला. या पैकी 17 स्पर्धकांना उज्वल यश संपादन केले. यात कु. शमिका शेळके 3000धावणे प्रथम आणि हॅमर थ्रो प्रथम, कु. सर्वेश घाडीगांवकर लांब उडी प्रथम उंच उडी तृतीय, रिले प्रथम, कु. चिंतामणी कासले ३०००मी.धावणे प्रथम आणि रिले प्रथम, कु. सावली घाडीगांवकर १५००मीटर धावणे तृतीय, कु. लक्षदिप गांवकर ३०००मीटर चालणे तृतीय, कु. विराज घाडीगांवकर ३०००मीटर धावणे द्वितीय, कु. चेतना घाडीगांवकर ४००मीटर धावणे प्रथम, कु. हर्षिता कासले १००मीटर हर्डल प्रथम आणि उंच उडी द्वितीय, कु. रसिका घाडीगांवकर ४००मीटर धावणे प्रथम, कु. मानस गांवकर ४००मीटर धावणे द्वितीय आणि १००मी हर्डल प्रथम, कु. श्रेयस चव्हाण ४०० मीटर हर्डल द्वितीय आणि ४००रिले प्रथम , कु. रुतीका शिंदे ४००मीटर धावणे तृतीय, कु. सानिका गांवकर थाळीफेक तृतीय, कु. वेदिका गांवकर लांब उडी तृतीय, कु. नचिकेत घाडीगांवकर हॅमर थ्रो द्वितीय असे उज्वल यश संपादित करुन या मैदानी स्पर्धेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या सर्व स्पर्धेकांच्या यशासाठी क्रीडा शिक्षक श्री. सुभाष सावंत यांनी मार्गदर्शन करुन अथक परिश्रम घेतले. तसेच किर्लोस गावचे सुपुत्र आणि क्रीडा प्रशिक्षक श्री. बाळकृष्ण कदम यांचे मार्गदर्शन लाभले. १४स्पर्धेकांची जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उज्वल यशाबद्दल सर्व संस्था पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य, शालेय समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर यांनी यशस्वी स्पर्धक आणि श्री. सावंत सर यांचे अभिनंदन केले आणि जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!