*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार ‘ अभियानाचा शुभारंभ*
*शिरगांव : संतोष साळसकर*
महिला व बाल विकास विभाग जि. प. सिंधुदुर्ग आयोजित देवगड तालुक्यातील शिरगांव प्रा. आ. केंद्र अंतर्गत साळशी आरोग्य उपकेंद्रात राष्ट्रीय पोषण अभियान घेण्यात आले.
राष्ट्राच्या आरोग्य दृष्टीकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार आणि पोषण यावर शासनाने भर दिला आहे. त्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी चाफेड, साळशी गावातील असंख्य महिला, पुरुष, जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी पल्लवी मुंडे, आरोग्य सहायिका रुपाली लाड, आरोग्य सेवक सतीश म्हाडदळेकर, गटप्रवर्तिका अर्पिता फाटक, मदतनीस प्रतिभा पोईपकर, आशा स्वयंसेविका सौं. प्रणिता राणे, अंगणवाडी सेविका मनीषा नाईक ( घाडीवाडी ), प्रतीक्षा शिवलकर ( देवणेवाडी ), मदतनीस – रसिका मिराशी (घाडीवाडी ), सुविधा किंजवडेकर ) आदिसह अनेक महिला, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
‘ महिलांचे आरोग्य निरोगी व सक्षम असेल तरच देश सक्षम होईल.’ हे उद्धीष्ट् ठेऊन हा उपक्रम राबविन्यात येत आहे. या अभियानात आरोग्य तपासणी बरोबर नागरिकांचे आभा कार्ड व PMJAY कार्ड काढून देण्यात येणार आहे. तर NCD screening करणे, गरोदर माता तपासणी, लसीकरण करणे, समुपदेशन व MCP Card वाटप करणे, समतोल आहार प्रदर्शन व संशयित क्षय रुग्ण, थुंकी तपासणी तसेच फिजिओथेरपी मार्गदर्शन, HLL Lab मार्फत रक्त तपासण्या व मोफत किरकोळ औषधे वाटप करणे आदी उपक्रम राबविण्यात आले.

