*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथे भात पीक कीड व रोग व्यवस्थापन विषयावर शेतकरी प्रशिक्षण शिबीर संपन्न*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी येथील ग्रामपंसंचायती सभागृहात 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत UNDP-GCF-ECRICC पुरस्कृत प्रकल्प – सन २०२५, अंतर्गत भात लागवड करण्याची ‘श्री’ (SRI) पद्धत तसेच भात पिकातील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना देवगड तालुका प्रकल्प समन्वयक श्रीमती दीपिका रावराने यांनी उपस्थित शेतकरी यांना प्रकल्पाचा मूळ उद्देश व संकल्पना समजावून सांगितली. तज्ञ मार्गदर्शक डॉ. भास्करराव काजरेकर, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी उपस्थित लाभार्थी शेतकरी यांना ‘श्री’ (SRI) पद्धतीने भात लागवड व भातावरील कीड व रोग यांचे योग्य रीतीने व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बीटएम देवगड चे निकेतन राणे, देवगड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) यांनी महाविस्तार AI ॲप बाबत माहिती दिली. उपस्थितांना महाविस्तार AI ॲप प्ले स्टोअर वरून इंस्टाल करणे, रजिस्टर करणे याबाबत प्रात्यक्षिक दाखवले. व महाविस्तार AI ॲप कसे काम करते याचे मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी, शिरगाव डॉ. श्री. बापूसाहेब लांबाडे यांनी कृषी समृद्धी योजनेतील अंतर्भूत बाबीवर शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. साळशी गावच्या सरपंच श्रीमती वैशाली सुतार यांनी अध्यक्षीय भाषणात कृषी विभागाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सरपंच सौं. वैशाली सुतार, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भास्करराव काजरेकर, श्रीमती दीपिका रावराणे, शिरगांव मंडळ कृषी अधिकारी डॉ. बापूसाहेब लांबाडे, सहाय्यक कृषी अधिकारी गुरुनाथ बोडेकर, विजय सुतार, पोलीस पाटील सौं. कामिनी नाईक, श्री संत ग्रामसंघ साळशी च्या सीआर पी सौं. ऋतुजा घाडी आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेतन राणे यांनी तर आभार प्रदर्शन गुरुनाथ बोडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी, साळशी यांनी केले.

