फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमार व्यवसायाचे नुकसान – मंत्री नामदार नितेश राणे यांची पाहणी

फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमार व्यवसायाचे नुकसान – मंत्री नामदार नितेश राणे यांची पाहणी

*कोंकण एक्सप्रेस*

*फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमार व्यवसायाचे नुकसान – मंत्री नामदार नितेश राणे यांची पाहणी*

*मच्छीमारांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष संवाद*

*पंचनामा अचूक व पारदर्शक करण्याच्या निर्देशांवर भर*

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाला झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी केली. या दौऱ्यात त्यांनी मच्छीमार व्यवसायातील अडचणी, नुकसानीचे स्वरूप व तातडीने आवश्यक उपाय समजून घेतले.

मंत्री नितेश राणे यांनी पंचनामा तातडीने, अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याचे ठोस निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान स्थानिक आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. किशोर तावडे तसेच इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

फुलंब्री धरण परिसरातील व्यवसायासाठी मच्छीमारांना त्वरित मदत पोहोचवणे आणि नुकसानाची पहाणी हा या दौऱ्याचा उद्देश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!