ओझरम तिर्थवाडी येथे रूक्मिनी महिला मंडळाच्या वतीने तुळजा भवानिचा जागर उत्साहात

ओझरम तिर्थवाडी येथे रूक्मिनी महिला मंडळाच्या वतीने तुळजा भवानिचा जागर उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*ओझरम तिर्थवाडी येथे रूक्मिनी महिला मंडळाच्या वतीने तुळजा भवानिचा जागर उत्साहात*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले.*

विठ्ठल रखुमाई मंदिर, ओझरम तीर्थवाडी येथे ‘रुक्मिणी महिला मंडळ तीर्थवाडी’ यांच्या पुढाकाराने जगतजननी तुळजाभवानीचा जागर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. रोज देवीला वस्त्र परिधान, अलंकार, हार फुलांची सजावट, नेवैद्य, आरती, प्रसाद तसेच रोज संध्याकाळी हरिपाठ, रात्री रासगरबा, महिलांचे भजन, फॅन्सी ड्रेस… अशा भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दुर्गामातेचा नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
विठ्ठल रखुमाई मंदिर वर्धापन दिन, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी तसेच दसरा-दिवाळी हे सण व उत्सव रुक्मिणी महिला मंडळाच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत.
मंडळाच्या सदस्यां सौ. दिव्या राणे, सौ. पूजा राणे, सौ. दूर्वा राणे, सौ. रक्षंदा राणे-पाटील, सौ. दीपाली राणे, सौ. शिल्पा राणे,सौ. देवयानी राणे, सौ. सुचित्रा राणे, सौ. वनिता धुरी, सौ. सुषमा राणे तसेच वाडीतील सर्वच महिला- भगिनींचा खूप मोठा सहभाग या कार्यक्रमात नेहमीच असतो. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती (रजि.) या लू मार्गदर्शना खाली या मंडळाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!