*कोकण Express*
*वीक एंड लॉकडाऊन” जनतेच्या भल्यासाठी, सर्वांनी सहकार्य करावे…*
*उदय सामंत; शनिवार-रविवार बंद, आठ महिन्यापूर्वीच्या नियमांप्रमाणेचे*
*सिंधुदुर्गनगरी ता.०९:*
वीक एंड लॉकडाऊन जनतेच्या भल्यासाठी लावण्यात आला आहे.यानिमित्त शनिवार व रविवारी आठ महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या लॉकडाऊन प्रमाणे सर्व नियम राहणार आहेत.केवळ मेडिकल सुविधा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे.त्यामुळे जनतेने याला सहकार्य करावे,असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यानी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरेंस सभागृहात आयोजित शासकीय पत्रकार परिषदेत मंत्री सामंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, खा विनायक राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, आ वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, संजय पडते, जान्हवी सावंत, विकास कुडाळकर आदी उपस्थित होते.