*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर कदम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन*
*शिरगांव : संतोष साळसकर*
कणकवली शिवशक्तीनगर येथील रहिवासी व मूळ मालवण-कांदळगाव येथील गंगाधर भीमराव कदम (५७) यांचे रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते साळशी प्राथ. शाळा नं. १ चे मुख्याध्यापक होते. याबाबतची खबर त्यांचा मुलगा स्मीतील गंगाधर कदम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
गंगाधर कदम हे घरी असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंगाधर कदम यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गंगाधर कदम यांना त्यांच्या नातेवाईकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंगाधर कदम यांना तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंगाधर कदम यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

