*भर पावसात दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*भर पावसात दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कोंकण एक्सप्रेस*

*भर पावसात दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात शनिवारी आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पाऊस असूनही शेकडोंनी यात सहभाग घेऊन ही दौड यशस्वी केली. दौडवेळी जय भवानी, जय दुर्गामातेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर येथून या दौडचे ठिकठिकाणी आरती ओवाळून, अक्षता व फुलांनी स्वागत केले. तर काही ठिकाणी सरबत आणि प्रसाद यांचे वाटप करण्यात आले. दुर्गामाता दौडसाठी पोलीस प्रशासनाने उत्तम सुरक्षा व्यवस्था केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!