*कोंकण एक्सप्रेस*
*तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत खर्डेकर महाविद्यालयाची बाजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील मुले व मुली दोन्ही गटात बॅ. खर्डेकर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. दोन्ही संघांनी उत्तुंग खेळाचे प्रदर्शन केले. या दोन्ही संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
या विजयाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.बी.गोस्वामी, पर्यवेक्षक डी.जे.शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, जिमखाना चेअरमन व्ही.पी.देसाई, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक वासुदेव गावडे, हेमंत गावडे, राष्ट्रीय खेळाडू सॅमसंग फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले.

