*कोंकण एक्सप्रेस*
*फेसबुक सायबर गुन्ह्यांचे मार्गदर्शन संपन्न*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
फेसबुक व इंटरनेटच्या माध्यमातून सायबर भामटे फसवणूक करीत असतात. फेसबुक व इंटरनेट या माध्यमांचा वापर करणा-यांनी अशा गैरप्रकारांना बळी पडू नये यासाठी सखोल मार्गदर्शन बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्लाच्या कृषी अधिकारी प्रिती कुबल-चव्हाण यांनी केले.
बँक ऑफ इंडिया शाखा वेंगुर्ल्याच्यावतीने वायंगणी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सायबर सुरक्षाबाबत सर्तकता व जागरुकता अभियान अंतर्गत २३ सप्टेंबर रोजी मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर बँक ऑफ इंडियाच्या कृषी अधिकारी प्रिती चव्हाण, वायंगणी ग्रामपंचायत सरपंच अवी दुतोंडकर, उपसरपंच रविंद्र धोंड, ग्रामपंचायत सदस्य विनू मठकर, महेश मुणनकर, अनंत केळजी, विद्या कांबळी, दिपाली नांदोसकर, सविता परब, विद्या गोवेकर, राखी धोंड, वायंगणी पोलिस पाटील स्वप्नाली मसुरकर यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

