रोटरी एक्सलन्सी अवॉर्डने शिक्षकांना सन्मानित

रोटरी एक्सलन्सी अवॉर्डने शिक्षकांना सन्मानित

*कोंकण एक्सप्रेस*

*रोटरी एक्सलन्सी अवॉर्डने शिक्षकांना सन्मानित*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुक्यात उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य राखणा-या पाच उत्कृष्ट शिक्षकांना रोटरी एक्सलन्सी अवॉर्ड देऊन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरूण भंडारे यांच्या हस्ते आणि असिस्टंट गव्हर्नर डॉ. कोलते यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
यामध्ये वेंगुर्ला नं.१चे मुख्याध्यानपक ज्ञानेश्वर हरमलकर, शाळा वजराट नं.१चे मुख्याध्यापक संजय परब, शाळा उभादांडा नं.३च्या मुख्याध्यापक नेहा गावडे, शाळा परबवाडा नं.१चे मुख्याध्यापक रामचंद्र झोरे आणि शाळा मातोंड पेंढ-याचीवाडीचे उपशिक्षक समिर तेंडोलकर यांचा समावेश आहे. याप्रसंगी रोटरीचे पोलिओ डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, अध्यक्ष आनंद बोवलेकर, सेक्रेटरी डॉ.राजेश्वर उबाळे, उपाध्यक्ष अॅड.प्रथमेश वेंगुर्लेकर, ट्रेजरर अनमोल गिरप, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सचिन वालावलकर, माजी अध्यक्ष योगेश नाईक, सुनिल रेडकर, राजू वजराटकर, पंकज शिरसाट, मृणाल परब, स्वप्निल झांटये, डॉ.पाटोळे, प्रा.भेंडवडे, पडते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!