*कोंकण एक्सप्रेस*
*मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांच्या वतीने महिलांसाठी महालक्ष्मी दर्शन*
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवाच्या औचित्याने सावंत उभयतांच्यावतीने मोफत विविध समाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
नवरात्र उत्सवात महालक्ष्मीदर्शन करण्याची अनेक महिलांची इच्छा असते परंतु सर्वांनाच जाणे शक्य होत नाही हीच बाब ओळखुन सध्या चालू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भिरवंडे व खलांतर गावातील महिलांना माजी जि प अध्यक्ष मा श्री संदेश उर्फ गोटया सावंत व मा सौं संजना सावंत यांच्या सौजन्याने कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी, जोतिबा व बाळूमामा देवस्थान यांचे मोफत देवदर्शन घडविण्यात आले.
यावेळी देवदर्शनात सहभागी महिलांनी मा श्री संदेश सावंत कुटुंबीय कायमच महिलांच्या अडीअडचणीत पाठीशी उभे राहतात या बद्दल समाधान व्यक्त केले असून देवदर्शन घडवील्याबदल आभार मानले आहेत.

