*कोकण Express*
*वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव ॲक्शनमोड मध्ये*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
राज्यात सर्वत्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वुमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. आज सकाळ पासूनच वैभववाडी कोल्हापूर मार्गावर वैभववाडीचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव स्वतः आपल्या सहकाऱ्यांसोबत विना मास्क तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करताना ॲक्शन मोड मध्ये दिसत आहेत.