*कोकण Express*
*कणकवली बसस्थानकात आढळला न.पं.सफाई कर्मचाऱ्याचा मृतदेह!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली बस स्थानक परिसरात नगरपंचायत कर्मचारी उत्तम मुणगेकर (वय ४५) रा.श्रावण यांचा मृतदेह सकाळी आढळून आला आहे. गेले कित्येक दिवस ते कणकवली न.पं.मध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते.
दरम्यान, काल ( गुरूवार ) रात्रीपासून ते कणकवली बस्थानकातच होते. तर आज ( शुक्रवारी ) सकाळी एस.टी.पास ऑफिस शेजारील बाकावर झोपलेल्या अवस्थेत बसस्थानकातल्या कर्मचाऱ्यांचा निदर्शनास आला. मात्र, कोणतेही हालचाल होत न्हवती! त्यामुळे या घटनेची माहिती, कणकवली पोलिस स्थानकात दिल्यानंतर घटस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पि एस आय अनमोल गावराने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही एम चव्हाण, धाव घेत पाहणी केली तसेच पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून त्यांना दारू चे व्यसन होते अशी चर्चा आहे, त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा, वडील असा परिवार आहे.