*कोंकण एक्सप्रेस*
*‘मिशन ९ बाय ९ वॉक अॅण्ड रन‘चे उद्घाटन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
‘आरोग्यदायी वेंगुर्ला‘ हे मिशन डोळ्यासमोर ठेऊन वेंगा फिटनेस फायटर ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या ‘मिशन ९ बाय ९ वॉक अॅण्ड रन‘चे उद्घाटन बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
नागरिकांचे आरोग्य समृद्ध राहण्याच्या हेतूने नवरात्रीच्यानिमित्ताने मागील तीन वर्षापासून फिटनेस फायटर ग्रुपतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल असे प्राचार्य गोस्वामी यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ.वामन कशाळीकर, वेंगा फिटनेसचे अध्यक्ष डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.नामदेव मोरे, प्राची मणचेकर, प्रदिप वेंगुर्लेकर, मोहन होडावडेकर, राजा रेडकर, बाबा वेंगुर्लेकर, डॉ.वंदन वेंगुर्लेकर, प्रा.अरविद बिराजदार, प्रा.विवेक चव्हाण, प्रा.भैरट, राजन गावडे, संगीता कुबल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटोओळी – ‘मिशन ९ बाय ९ वॉक अॅण्ड रन‘चे उद्घाटनप्रसंगी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

