*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे काम ठप्प*
*कणकवली पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली. अशाप्रकारे शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी ही देशातील पहीलीच योजना आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये रोखीने जमा होतात. मात्र, असे असताना सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम गेले काही दिवस पूर्णत: ठप्प आहे. कृषी व महसूल विभागाच्या समन्वयाने हे काम सुरू होते. मात्र, आता महसूल विभाग आपण हे काम करत नसल्याचे सांगून किसान सन्मान योजनेसाठी येणाऱ्या लाभार्थींना कृषी विभागाकडे पाठवतात तर कृषी विभागाकडून हे काम होत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आपण याबाबत तातडीने गांभिर्याने दखल घेऊन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे ठप्प झालेले काम सुरू करण्याचे आदेश दयावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयावा, अशी मागणी कणकवली पंचायत समितीचे सदस्य मिलिंद मेस्त्री यांनीजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.