*कोंकण एक्सप्रेस*
*प्रा.महेश बोवलेकर यांना ‘गुरूसेवा पुरस्कार‘ प्रदान*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वेंगुर्ला येथील रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजचे प्रा.महेश बोवलेकर यांना आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते ‘गुरूसेवा पुरस्कार‘ देऊन सन्मानीत करण्यात आले.
हा पुरस्कार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व छात्रप्रबोधन मंडळ सावंतवाडी यांच्या विद्यमाने जाहीर झाला होता. सावंतवाडी येथील गोविद चित्रमंदिरात हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड.निता कविटकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, पुरस्कार निवड समिती प्रमुख भरत गावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
फोटोओळी – आमदार केसरकर यांच्या हस्त बोवलेकर यांना गुरूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

