*कोंकण एक्सप्रेस*
*अखेर संदेश वरक यांचा राजीनामा नामंजूर ; जे काही गैरसमज होते ते केले दूर..*
*दोडामार्ग / शुभम गवस*
*वाचा सविस्तर बातमी*👇
संदेश वरक यांनी शिवसेना उपतालुका संघटक पदांचा दिलेला राजीनामा शिवसेना जिल्हा कार्यकारिणी ने नामंजूर केला असल्याची माहिती.. जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली आहे… मिळालेल्या माहितीनुसार वरक हे लोकसभा व विधानसभेत मिळालेल्या अपयशाला काही वरीष्ठ जबाबदार असल्याने..आता मिळालेल्या अपयशामुळे ,संघटनेत आलेल्या सुस्त पणामुळे कार्यकर्त्यांत नैराश्य आहे..या सर्व कारणांमुळे आपणास काम करण्यास अशक्य आहे असं त्यांचे म्हणणे होते..त्यांचे सर्व गैरसमज तालुका व जिल्हा कार्यकारिणी तून दूर करण्यात आले व त्यांची समजूत करून राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे..

