*कोंकण एक्सप्रेस*
*तळेरे उपसरपंच पदी संदीप घाडी यांची बिनविरोध निवड*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
तळेरे ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपचे सदस्य संदीप घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच हनुमंत तळेकर यांनी संदीप घाडी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व सहकारी सदस्य यांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे घाडी यांनी स्पष्ट केले.
तळेरे ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता असून नियोजनाप्रमाणे उपसरपंच रिया चव्हाण यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. मंगळवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली या पदासाठी भाजपचे संदीप घाडी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजलक्ष्मी जाधव यांनी जाहीर केले यावेळी सरपंच हनुमंत तळेकर, माजी उपसरपंच रिया चव्हाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसरपंच संदीप घाडी यांचे या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

