*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला येथे श्री दुर्गामाता दौडचे आयोजन*
*वेंगुर्ले : प्रथमेश गुरव*
*वाचा सविस्तर बातमी👇*
भारतमातेच्या कल्याणासाठी, देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिदूस्थान वेंगुर्ला व हिदूधर्माभिमानी मंडळी वेंगुर्ला यांच्यावतीने २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे. वेंगुर्ला शहरामध्ये प्रथमच ही दौड संपन्न होणार आहे.
आजही आपल्या देशावरती, धर्मावरती अनेक संकटे उभे आहेतउ त्या संकटांना मात करण्याची, त्या संकटांचा समूळ निर्दालन करण्याची शक्ती सर्वांनी मिळावी यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी गावोगावी हिंदूंना संघटित करून स्त्री शक्तीचा सन्मान आणि जागर करण्यासाठी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करीत आहेत.
या दौडच्या नियोजनासाठी वेंगुर्ला येथील विठ्ठल मंदिरात नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिदूस्थान व हिदूधर्माभिमानी मंडळी उपस्थित होती. शनिवार दि. २७ रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातून या दौडला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक माणिकचौक, शिरोडा नाका, शिवदुर्गा मित्रमंडळ दुर्गामाता (सुंदर भाटले), मातोश्री कला क्रिडा मंडळ दुर्गामाता, गाडीअड्डा मित्रमंडळ दुर्गामाता, मारुती स्टॉप ते पुन्हा रामेश्वर मंदिर येथे ही दौड येणार आहे. दौडची सांगता झाल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिदूस्थानचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या दौडमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आयोजकांतर्फे केले आहे.

