‘‘आमचा समुद्रकिनारा वाचवा, अवैद्य वाळूउपसा थांबवा‘‘

‘‘आमचा समुद्रकिनारा वाचवा, अवैद्य वाळूउपसा थांबवा‘‘

*कोंकण एक्सप्रेस*

*‘‘आमचा समुद्रकिनारा वाचवा, अवैद्य वाळूउपसा थांबवा‘‘ *

*वेंगुर्ले : प्रथमेश गुरव*

*वाचा सविस्तर बातमी👇*

            समुद्रकिना-यावरील होणा-या अवैद्य वाळू उपसाबाबत आरवली-टांक येथे अज्ञातांकडून बॅनर लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ‘‘आमचा समुद्रकिनारा वाचवा, अवैद्य वाळूउपसा थांबवा‘‘ अशी मागणी या बॅनरद्वारे करण्यात आली आहे.
समुद्रकिनायावरील वाळूची बैलगाड्यांनी तस्करी केली जात असल्याचे या बॅनर वरून अधोरेखित करण्यात आले आहे. तर प्रजननासाठी समुद्र किना-यावर येणा-या ऑलिव्ह रिडले कासव वाचवाची मागणीही या बॅनरद्वारे करण्यात आली आहे. तर एका बाजूला हातात पैशांची बॅग घेतला सूटमधील व्यावसायिक पारंपरिक मच्छिमार व स्थानिक मच्छिमार यांना ‘समुद्र तुमच्या बापाचा नाही‘ असे सांगत असल्याचे चित्र बॅनरवर दाखवण्यात आले आहे. दरम्यान या बॅनरमूळे वेंगुर्ल्यातील काही समुद्र किना-यावर अवैद्य वाळू उपसा होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!