*कोंकण एक्सप्रेस*
*आचिर्णे ग्रामपंचायत येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी*
*वैभववाडी( प्रतिनीधी)*
आचिर्णे ग्रामपंचायत येथे तसेच यशवंतराव चव्हाण विद्यालयात आचिर्णे येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली .
कर्मवीर जयंती म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस साजरा करणे. २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला, म्हणून ‘कर्मवीर जयंती’ म्हणून त्यांच्या कार्याची आठवण केली जाते. त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी ‘रयत शिक्षण संस्था’ स्थापन केली आणि ‘कमवा व शिका’ या तत्त्वावर आधारित शिक्षणाची सुरुवात केली.
जयंतीला उपस्थित आचिर्णे गावचे सरपंच उपसरपंच तसेच गावचे ग्रामस्थ आणि आचिर्णे विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक इ उपस्थित होते .

