कोंकण एक्सप्रेस
शिवदुर्गा नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव
वाचा सविस्तर बातमी👇
वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोमवार दि.२२ ते गुरुवार दि.२ ऑक्टोंबर कालावधीत तालुका शिवसेना कार्यालय, सुंदरभाटले येथे सार्वजनिक नवरात्रौत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
दि. २२ रोजी स. ९ वा. ढोल ताशांच्या गजरात देवीचे आगमन, सायंकाळी ७ वा.वेंगुर्ला साई मंदिराच्या भक्तांची महाआरती, रात्री ८ वा. ओंकार द.ना.मंडळाचे नाटक, दि. २३ रोजी सायं. ७ वा. १२ वर्षाखालील व १२ वर्षावरील गटामध्ये तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा (संफ-वैभव फटजी-९८६०९२७७१३), दि. २४ रोजी सायं. ७ वा. निमंत्रित दांडिया नृत्य (संफ-सौ.समिता शेळके-७५८८४३४२८८), दि. २५ रोजी सायं. ७ वा. संगीत भजन स्पर्धा (संफ-संदिप पेडणेकर-८४११८२८६६०), दि.२६ रोजी सायं. ७ वा. संगीत भजन स्पर्धा (संफ-संदिप पेडणेकर-८४११८२८६६०), दि.२७ रोजी रात्रौ ८ वा. तालुकास्तरीय ग्रुप डान्स स्पर्ध (संफ-शैलेश परुळेकर-९१७२३७२२४४), दि. २८ रोजी रात्रौ ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि. २९ रोजी रात्रौ ९.०० वा. होममिनिस्टर (संफ-कोमल सरमळकर-७३७८९४६३४५), दि.३० रोजी रात्रौ ८ वा. ओंकार कलामंच यांचा ‘ऑर्केस्ट्रा‘, दि. १ रोजी रात्रौ ८ वा. अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘माझे माहेर पंढरी‘ हे ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाटक, दि. २ रोजी सायं. ५ वा. ढोल ताशांच्या गजरात मांडवी खाडी येथे श्री दुर्गामातेचे विसर्जन. नवरात्रौत्सव कालावधीत रोज सकाळी ९ वा. श्री दुर्गामातेचे पूजन व आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ६ वा. भजन असे कार्यक्रम होतील. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष संदेश निकम, खजिनदार अजित राऊळ, गजानन गोलतकर यांनी सार्वजनिक नवरात्रौत्सव कमिटीच्यावतीने केले आहे.


