स्वच्छ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वच्छ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*स्वच्छ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

*वाचा सविस्तर बातमी👇*

स्वच्छता ही सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने १९ सप्टेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी अशा दोन गटांतील शहरातील सर्व शाळांमधून एकूण ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
चित्रकला स्पर्धेसाठी ‘माझी स्वच्छ शाळा‘, ‘प्लास्टिक मुक्त शहर‘, ‘स्वच्छ समुद्रकिनारा‘, ‘स्वच्छतेचा बालमहोत्सव‘, ‘झाडे लावा झाडे जगवा‘ हे विषय ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून स्वच्छतेचे विविध संदेश रंगांच्या माध्यमातून रेखाटले. यासोबतच त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही प्रभावीपणे मांडले. शालेय मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच स्वच्छतेविषयीचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवणे हा मुख्य हेतू चित्रकला स्पर्धेच्या आयोजनामागे असल्याचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!