*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका प्रदान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा‘ या ब्रीदवाक्या अंतर्गत भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरासाठी रूग्णवाहिका देण्यात आली. याचा शुभारंभ आज भाजपा कार्यालय येथे भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अॅड. अनिल निरवडेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, महिला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, ओबीसी सेल अध्यक्ष रमेश नार्वेकर, शरद मेस्त्री, अल्पसंख्याक सेल सायमन आल्मेडा तसेच महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, हसीनाबेन मकानदार, रिया केरकर, कृपा मोंडकर, शक्ती केंद्र प्रमुख किरण कुबल, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, मठ सोसायटी चेअरमन सुभाष खानोलकर, रविद्र खानोलकर, नामदेव सरमळकर, पुंडलिक हळदणकर, भानुदास कुबल, श्याम खोबरेकर, विजय रेडकर, समीर कुडाळकर, प्रशांत नाईक, सचिन शेटये, गणपत राऊळ यांच्यासह शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, तालुका कार्यकारणी सदस्य, विविध मोर्चा आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटोओळी – वेंगुर्ला शहरासाठीच्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

