*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन कुर्ली येथे नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा युवा मंडळाकडून विविध कार्यक्रम*
*देवी दुर्गामतेची प्रतिष्ठापना करुन सलग २३ व्या वर्षी कार्यक्रमांचे आयोजन*
नवीन कुर्ली फोंडाघाट येथे नवदुर्गा युवा मंडळाकडून भवानी मैदानावर सार्वजनिक नवरात्रोत्सवानिम्मित देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन शारदीय नवरात्रारंभ सोमवार दि.२२ सप्टें. २०२५ ते विजयादशमी दसरा गुरुवार दि.०२ ऑक्टो. २०२५ या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, तसेच सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा होणार आहे.
यामध्ये सोमवार दि.२२ सप्टें. सकाळी १०.०० वा. देवीचे आगमन, देवीची प्रतिष्ठापना, घटस्थापना, पुजा, आरती. सायं. ७:०० वा. कुर्लादेवी प्रासा.भजन मंडळ नवीन कुर्ली बुवा अमित दळवी याचे भजन,आरती. रात्रौ ९:०० वा. दांडिया नृत्य. मंगळवार दि.२३ सप्टें. सायं. ७:०० वा. श्री देव रवळनाथ प्रा. भजन मंडळ बुवा साहिल पारकर यांचे भजन. रात्रौ ९:०० वा. दांडिया नृत्य. बुधवार दि.२४ सप्टें. सांय. ७:०० वा. ह. भ.प. विजय नारायण मेस्त्री यांचा हरिपाठ. रात्रौ. ९:०० वा. दांडिया नृत्य. गुरुवार दि.२५ सप्टें. सायं. ७:०० वा. श्री लिंगेश्वर पावनादेवी प्रा. भजन मंडळ वाघेरी बुवा सचिन राणे यांचे भजन, रात्रौ ९:०० वा. दांडिया नृत्य. शुक्रवार दि.२६ सप्टें. सकाळी ९:०० वाजता रक्तदान शिबिर, सायं. ७:०० वा. श्री दत्तगुरु प्रा. भजन मंडळ कासार्डे बुवा प्रकाश पारकर यांचे भजन, आरती, रात्रौ ९:०० वा. दांडिया नृत्य. शनिवार दि.२७ सप्टें. सायं. ७:०० वा. पावणादेवी प्रासा. भजन मंडळ फोंडाघाट बुवा- हेंमत तेली यांचे भजन, रात्रौ. ९:०० वा. दांडिया नृत्य. रविवार दि. २८ सप्टें. सायं. सायं. ४:०० वा. हळदीकुंकू, सायं. ७:०० वा. श्री देव केसरकर हनुमान प्रा. भजन मंडळ वर्दे कुडाळ बुवा योगिता चव्हाण यांचे भजन, रात्रौ ८:०० महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ रात्रौ. ९:०० वा. दांडिया नृत्य. सोमवार दि.२९ सप्टें. सायं. ७:०० वा. श्री कुर्लादेवी प्रा. भजन मंडळ बुवा कविता चव्हाण यांचे भजन रात्रौ. ९:०० वा. दांडिया नृत्य. मंगळवार दि.३० सप्टें. दुपारी १२:३० वा. देवीचा महाप्रसाद, सायं. ७:०० वा. कुलस्वामिनी प्रा. भजन मंडळ नागसावंतवाडी कासार्डे बुवा अतुल सावंत यांचे भजन रात्रौ. ९:०० वा. दांडिया नृत्य. बुधवार दि.०१ ऑक्टो. सायं. ०७:०० वा. नवजवान उन्नती मंडळ पियाळी बुवा संतोष कानडे, बुवा श्रीधर गोसावी यांचे चक्री भजन, रात्रौ. ९:०० वा. दांडिया नृत्य. गुरुवार दि. २ ऑक्टो. सायं. ५:०० वा. सोने लुटणे रात्रौ. ९:०० वा. दांडिया नृत्य,रात्रौ. १०:०० वा. बक्षिस वितरण सोहळा व आभार प्रदर्शन कार्यक्रम. शुक्रवार दि.०३ ऑक्टो. दुपारी ३:०० वा. देवीची उत्तरपुजा व देवीची आरती व सायं. ४:०० वा. भव्यदिव्य मिरवणुक सोहळा व देवीचे विर्सजन. अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थ व भाविक- भक्तांनी लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवुन सहकार्य करावे असे आवाहन संचालक मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

