निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने फुलविली फळबाग

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने फुलविली फळबाग

*कोंकण एक्सप्रेस*

*निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने फुलविली फळबाग*

*शिरगांव : संतोष साळसकर*

पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यावर शेतीविषयी आवड असलेले देवगड तालुक्यातील साळशी गावात सासरच्या पडीक जमिनीवर चंद्रशेखर कोंडयेकर यांनी अथक परिश्रम घेऊन नंदनवन फुलवले आहे.
शेतीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची ही यशोगाथा असून सरकारच्या कसल्याही योजनांचा लाभ न घेता आंबा, काजूसह विविध फळे, फुलांची बागायती तयार करण्यात करण्यात आली आहे. निसर्गावर, पशुपक्ष्यांवर जीवापाड प्रेम करणारे कोंडयेकर दीड हजार झाडांचे पोशिंदे झाले असून झाड जगले तरच माणूस जगेल असा संदेश यानिमित्ताने त्यांनी दिला आहे. मूळचे मालवण तालुक्यातील बांदिवडे हे चंद्रशेखर कोंडयेकर यांचे गाव. आठवी पास पर्यंतचे शिक्षण गावीच झाले.

*पोटापाण्यासाठी गाठली मुंबई*

स्वतःची अशी हक्काची जागा नसल्यामुळे दुसऱ्याच्या शेतात मजुरीवर राबायचे. राहण्यापुरतेच घर यामुळे कामधंद्यासाठी नववी नापास झालेल्या कोंडयेकर यांनी मुंबईची वाट धरली. सुरुवातीला प्रिंटिंग प्रेसमध्ये गोरेगाव या ठिकाणी ११ वर्षे नोकरी केली. १७जून १९८५ रोजी झालेल्या पोलीस भरतीत शिपाई म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर पोलीस नाईक, पोलीस हवालदार, पोलीस ऑफिसर म्हणून बढती मिळाली. नायगाव हेडकॉटर, जुहू पोलीस ठाणे, मालाड पोलीस ठाणे, एस बी साईड ब्रांच, बांगर पोलीस ठाणे, संरक्षण सुरक्षा विभाग असे मिळून ३४ वर्षे पोलीस खात्यात सेवा करून २०१९ मध्ये कोंडयेकर निवृत्त झाले.

*पडीक जमीन लागवडीखाली आणा*

त्यांनी आपली पत्नी शीतल हिच्या सांगण्यावरून माहेरची चाफेकर कुटुंबियांची पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी निवृत्ती अगोदरच टप्प्याटप्प्याने मग गावातील घर भाटले, वावल, तेराल अशा ठिकाणच्या १० एकर जमिनीत टप्प्याटप्प्याने आंबा, काजूच्या गावठी आणि विकसित जाती, नारळ चिकू, पेरू, जाम, कडुलिंब, अननस, चाफा, तुळस, बेलपत्र, अडुळसा, शमी, यासारखी अनेक प्रकारची रोपे लावून त्यांना वाढवायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!