*कोंकण एक्सप्रेस*
*सेवा पंधरावडा निमित्त आचिर्णे रासाई देवी मंदिर येथे ग्रामस्थांनी
राबवली स्वच्छता मोहीम*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
सेवा पंधरावडा निमित्त आचिर्णे येथे असलेल्या रासाई देवीच्या मंदिरात आचिर्णे गावातील ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम राबवली . मोहीमेत आचिर्णे गावातील ग्रामस्थांनी भाग घेतला तसेच आचिर्णे गावात कार्यरत असणारे शालेय शिक्षक अंगणवाडी कर्मचारी तसेच इतर शासकिय कर्मचारी यांनी देखिल सहभाग घेतला होता .

