*कोकण Express*
*महाराष्ट्रात काम करणा-या अधिकारी कर्मच्या-याना मराठी बोलता आलच पाहिजे*
*सिंधुदूर्गातील युनियन बॅकेच्या कर्मच्यारांना मनसेचा ईशाराा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा असावी व महाराष्ट्र राज्यात अधिकारी व कर्मचार्यांनी मराठी भाषेचा वापर करुन मराठीत पत्र व्यवहार आणि मराठीत संभाषण करावे. अधिकारी आणि कर्मचार्यांना मराठी येणे सक्तीचे आहे. अशाप्रकारे शासन परिपत्रक, शासननिर्णय केलेले असुन मराठी भाषा ही महाराष्ट्राची अभिजात भाषा अशावी असा ठरावही महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारला पाठवला आहे.

तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सिंधुदुर्ग जिल्ह्याची मागणी शासन निर्णयाप्रमाणे आपण वरिष्ठांमार्फत पूर्ण करावी अशी मागणी मनसे नेते प्रशांत उपरकर यांनी केली.
यावेळी गिरीश उपरकर, सुनील मिस्त्री, विनोद बिर्जे, संतोष कुडाळकर, योगेश गुरव उपस्थित होते.