*कोंकण एक्सप्रेस*
*पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेचे कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून या योजनेत सुधारणा करण्यात आलेली असून कर्जमर्यादा दहा हजारावरून १५ हजार, दुस¬-या टप्प्यातील कर्जमर्यादा २० हजारावरून २५ हजार आणि तिस-या टप्प्यातील कर्जमर्यादा ५० हजार करण्यात आली आहे.
शहरातील अनेक फेरीवाले त्यामध्ये भाजी, फळे, मच्छि आणि खाद्यपदार्थ विक्रेते तसेच हातगाडीधारक, रस्त्याच्या दुतर्फा बसणारे सर्व फेरीवाली यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. डिजिटल व्यवहार करणा-या फेरेवाल्यांना कॅशबॅक मिळणार आहे.

