पदव्युत्तर शिक्षण, रिसर्च सेंटर सुरू करण्याचा मानस – प्राचार्य गोस्वामी

पदव्युत्तर शिक्षण, रिसर्च सेंटर सुरू करण्याचा मानस – प्राचार्य गोस्वामी

*कोंकण एक्सप्रेस*

*पदव्युत्तर शिक्षण, रिसर्च सेंटर सुरू करण्याचा मानस – प्राचार्य गोस्वामी*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला मिळालेला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हा वेंगुर्ला पंचक्रोशीवासीयांचा आहे. या पुरस्कारासाठी आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्था चालक या सर्वांचे योगदान आहे. आता आमची जबाबदारी वाढली असून आगामी काळात या महाविद्यालयात उच्च शिक्षणासहीत, पदव्युत्तर शिक्षण, रिसर्च सेंटरसारखी दालने उपलब्ध करून देणार असल्याचे प्राचार्य डॉ.धनंजय गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य गोस्वामी म्हणाले की, मुंबई विद्यापीठामध्ये ग्रामीण भागात साधारण ७०० ते ८०० महाविद्यालय आहेत आणि या सर्वातून बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला हा पुरस्कार मिळाला आहे. या महाविद्यालयात कशाप्रकारे संशोधन सुरू आहे. कोणकोणते उपक्रम राबवले जातात, मैदानी खेळात तसेच राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय विविध स्पर्धात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश, एनसीसीची कामगिरी, महाविद्यालयात सर्व महत्त्वांच्या जागांवर कायम शिक्षक आहेत की नाही, शिक्षकांचे कशाप्रकारे शिक्षण आहे, ते यावर संशोधन करून शिक्षण देतात का?, शिक्षकांना काही पुस्तक लिहावी लागतील, संशोधन करावे लागेल या सर्वांचा विचार करून तसेच तुमचं महाविद्यालय समाजासाठी किती उपयुक्त आहे याची पाहणी समितीद्वारे करूनच हा पुरस्कार दिला जातो.
जेव्हा महाविद्यालयाला ‘ए‘ ग्रेड मिळून सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळतो तेव्हा येत्या काळात अजून जोमाने काम करण्याची ताकद येते. शिक्षण प्रसारक मंडळाचे १९६१ सालापासून याठिकाणी हे महाविद्यालय सुरू झाले आहे. भविष्यात याठिकाणी पदव्युत्तर शिक्षण, रिसर्च सेंटर या आमच्या व संस्था चालकांच्या आगामी संकल्पना आहेत त्या आम्ही निश्चित पूर्ण करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात शिक्षण क्षेत्रात जे काही काम सुरु आहे त्यांच्या या संकल्पनेनुसार महाविद्यालयात डेटा बेस डिग्री कोर्स, कॉम्प्युटर सायन्स, ए आय कोर्स हे येत्या काळात सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले.
फोटोओळी – बॅ. खर्डेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा. डॉ.गायकवाड, प्रा.डॉ. सचिन परुळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!