*कोंकण एक्सप्रेस*
*नरडवे तंटामुक्त अध्यक्ष पदी अंकुश सावंत यांची चौथ्यांदा निवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नरडवे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी अंकुश रामचंद्र सावंत (बाळा गुरूजी) यांची सलग चार वेळा बिनविरोध निवड झाली आहे. गेली तर सचिवपदी गुरुनाथ साटम यांनी नियुक्ती करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड झाली. अंकुश सावंत हे अनेक वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. शैक्षणिक उपक्रमांमध्येही ते सक्रिय असतात. गावातील तंटे स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत असून या पुढेही असेच काम करू असे मनोगत अंकुश सावंत यांनी व्यक्त केले. ग्राम सभेत सरपंच गणपत सावंत , उपसरपंच श्विनोद बागवे, सर्व ग्रा.पं.सदस्य ,तंटामुक्त समितीचे सचिव श्री.सदेश साटम व सर्व पोलीस पाटील, बहुसंख्य ग्रामस्थ , महिला भगिनी, तलाठी श्री.अजय भांडेकर, ग्रामसेवक श्री.यशवंत तांबे उपस्थित होते.

