*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथील हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि पर्यटनदृष्ट्या नटलेल्या निसर्गरम्य अशा साळशी गावातील चौऱ्यांशी खेड्याची अधिकारी श्री देवी पावणाई देवालयात दि. 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत सात दिवसांचा अखंड हरीनाम सप्ताह अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
यावेळी सुदर्शन भजन मंडळ शिरगाव, भावई भजन मंडळ वरेरी, पावणाई भजन मंडळ मठबुद्रुक, पारकर बुवा कासार्डे, ठाणेश्वर भजन मंडळ भरणी घाडीवाडी, गांगेश्वर भजन मंडळ चाफेड घाडीवाडी, परमहंस भालचंद्र महाराज भजन मंडळ कणकवली,विठ्ठल रखुमाई भजन मंडळ मठ बुद्रुक, फोडकणदेवी भजन मंडळ निरोम, आरेश्वर भजन मंडळ आरे,गाय गोठण भजन मंडळ चाफेड भोगलेवाडी, पावणाई बांदेश्वर भजन मंडळ शिरगाव रामनगर,दुर्गा माता भजन मंडळ मालवण कट्टा आई कुलस्वामिनी भजन मंडळ चाफेड राणेवाडी रोहिलेवाडी भजन मंडळ आयनल, श्रीदेवी हिदुबाई भजन मंडळ खुडी,भगवती प्रसादिक भजन मंडळ तोरसोळे,कुलस्वामिनी भजन मंडळ कोळोशी, ब्रह्म गणेश भजन मंडळ कुवळे तर्फेवाडी, वेलकेश्वर भजन मंडळ ओबळ काजरवाडी,पावणाई भजन मंडळ किंजवडे परबवाडी, ओंबळ भजन मंडळ,नवतरुण भजन मडळ शिरगांव,गणेश सेवा भजन मंडळ कणकवली हळवळ, श्री सिद्धेश्वर पावणाई भजन मंडळ साळशी अशा २५ दिंडी सहभागी झाल्या होत्या.
या हरिनाम सप्ताहाच्या सातव्या रात्री श्री संत सिद्धेश्वर पावणाई भजन मंडळ साळशी यांनी “हैग्रीव राक्षसाचा वध” पौराणिक चित्र देखावा काढून उपस्थित त्यांची मने जिंकली. यामध्ये हैग्रीव राक्षस ( गणेश मिराशी ), पराशक्ती देवी ( इतिषा घाडी ), श्री विष्णू ( शैलीप साळसकर ), यांनी चांगल्या प्रकारे वेशभूषा सजविल्या होत्या. तसेच प्रवीण नाडणकर, सुहास कोदे, प्रकाश किंजवडेकर, राजू घाडी यांनीही वेगवेगळे वेशभूषा सादर करून सर्वांचे मनोरंजन केले. या हरिनाम सप्ताहाची सांगता 18 सप्टेंबर रोजी पहाटे काकड आरती करून झाली. या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक आले होते. या सर्व भाविकाची तसेच आलेल्या भजनी मंडळाची देवस्थान ट्रस्ट तर्फे चांगली चांगली उठाबस करण्यात आली.

