*कोकण Express*
*कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली असलदे बागायतीला भेट*
*सरपंच पंढरी वायंगणकर यांनी केली चर्चा*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज कणकवली तालुक्यातील असलदे सरपंच पंढरी वायंगणकर व सदस्य दिनकर दळवी यांच्या काजू बागेला भेट देऊन पाहणी केली आहे . यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर यांनी काजू दर व बोंडू पासून प्रक्रीया करण्याच्यादृष्टीने सकारात्मक चर्चा केली
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामसेवक आर.डी सावंत,सो.सा.चेअरमन प्रकाश परब, अरुण गावकर, योगेश सदडेकर तसेच कृषी अधिकारी ठाणे सहसंचालक लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक मेहेत्रे, अजित अडसोळे,तालूका अधिकारी हजारे,तोरणे,सी.एम.कदम, हुसेन आंबार्डेकर,बाळा परब,राजन सावंत आदी उपस्थित होते
यावेळी कृषी मंत्री दादा भुसे यांनी जवळपास अर्धा तास बागेची पाहणी केली ३६ एकर क्षेत्रावर काजू लागवड केली असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहेे
.