झोळंबे येथील सुनेश उदय गवस यांना मदतीची गरज ; कीडण्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने त्रस्त..

झोळंबे येथील सुनेश उदय गवस यांना मदतीची गरज ; कीडण्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने त्रस्त..

*कोंकण एक्सप्रेस*

*झोळंबे येथील सुनेश उदय गवस यांना मदतीची गरज ; कीडण्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने त्रस्त..*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

झोळंबे येथील सुनेश उदय गवस (३२) हा युवक दोन्ही कीडण्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने त्रस्त आहे. आपल्या एकुलत्या एक मुलासाठी त्याची आई कीदृणी द्यायला तयार आहे. मात्र, कीदृणी ट्रान्सफर शस्त्रक्रियेसाठी सुमारे १२ ते १४ लाख रुपयांचा खर्च असून तो त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून शस्त्रक्रियेसाठी जिल्हावासीयांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी. ही तातडीची मदत सुनेश याला नवसंजीवनी देऊ शकणार असून त्यामुळे एका कुटुंबाला आधारही मिळणार आहे.

आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या गवस कुटुंबात सुनेशसह त्याची पत्नी, तीन वर्षाची मुलगी आणि आई आहे. त्याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. सुनेश गोवा-वेर्णा येथील बर्न अँड इम्पिनॉल प्रा. लि. या टॉवरच्या अँटिना बनविण्याच्या कंपनीत कामाला होता. यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. जमीन अथवा शेतीसह अन्य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पाच महिन्यांपासून सुनेशला अशक्तपणा वाटू लागला
तो आजाराने त्रस्त होता. त्यानंतर निदान केले असता, त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच गवस कुटुंबिय अक्षरशः कोलमडून पडले. त्यानंतर सुनेश सध्या डायलिसीसवर आहे.

आपल्या पोटचा गोळा वाचण्यासाठी त्याची आई ऊर्मिला किडणी द्यायला तयार आहे. मात्र, किडणी ट्रान्सफरसाठी १२ ते १४ लाखांचा खर्च असल्याचे ऐकून गवस कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. एवढी रक्कम आणायची कुठून, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अतिशय दुर्धर असलेल्या या आजाराची सुनेशला माहिती आहे. मात्र, स्वतःला सावरत अजूनही तो खचलेला नाही. आपले पूर्वर्वीचे जीवन जगण्याची त्याची इच्छा आहे. आतापर्यंत सुनेशच्या उपचारासाठी गवस कुटुंबियांनी होते नव्हते, ते सर्व संपविले सुनेशच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलविण्यासह त्याच्या कुटुंबियांच्या आधारासाठी समाजमनाच्या दातृत्वाची गरज आहे. सुनेशच्या पुढील उपचारासाठी जिल्हावासीयांना मदतीसाठी हाक दिली आहे.

ज्यांना सुनेश यांना मदत करायची आहे, त्यांनी सुनेश उदय गवस, खाते नंबर १४६५१०५१००००६६३ आयएफएससी कोड, बीकेआयडी ०००१४१० बैंक ऑफ इंडिया, शाखा बांदा या खात्यावर जमा करावी. तसेच गुगल पे नंबर ९४०५१५२२७५ आणि यूपीआय आयडी suneshgawas1953@ okicici हा आहे. यावरही मदत देऊ शकता. अधिक माहितीसाठी रवींद्र गवस ९४२०९५०७३३ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन झोळंबे प्रिमियर क्रिकेट लीगतर्फे तेथील तरुणांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!