श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे शाळेत ; तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन…

श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे शाळेत ; तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन…

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे शाळेत ; तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन….*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे या ठिकाणी दिनांक 15/9/2025 रोजी संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आंबुलकर सर शालेय समिती सदस्य श्री तिलकांचन गवस, पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत जाधव, पालक शिक्षक संघाच्या माजी उपाध्यक्षा सौ. सेजल गवस आणि झरेबांबर गावचे उपसरपंच व शाळेचे माजी विद्यार्थी श्री. श्याम नाईक तसेच तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळेतील क्रीडा शिक्षक व शालेय कबड्डी खेळाडू स्पर्धक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शालेय शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच खेळाचे सुद्धा महत्त्व आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते मन प्रसन्न राहते आणि आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांची मदत होते. अशा शब्दात मुख्याध्यापक शालेय समिती सदस्य आणि पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले त्यानंतर खेळांच्या मैदानावर श्रीफळ वाढवून मुख्याध्यापकांनी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!