तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलचेचं वर्चस्व

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलचेचं वर्चस्व

*कोंकण एक्सप्रेस*

*तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलचेचं वर्चस्व*

*कणकवली तालुकास्तरीय शालेय कॅरम चॅम्पियनशीप पुन्हा एकदा कनेडी हायस्कूलकडेच*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा सन २०२५ नुकतीच कनेडी हायस्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेवर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स‌‌‌, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी या प्रशालेने दरवर्षी प्रमाणे आपले वर्चस्व राखले व पुन्हा एकदा चॅम्पियनशीप स्वतःकडेच राखली. सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण २७० पेक्षा जास्त कॅरम खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये प्रशालेतील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे –
१४ वर्षाखालील मुली –
मीरा मकरंद आपटे इ. ७वी (द्वितीय क्रमांक)
१७ वर्षाखालील मुली-
श्रेया राजेंद्र महाडिक इ. ११वी (प्रथम क्रमांक), दिव्या नंदकिशोर चव्हाण इ. ९वी ( द्वितीय क्रमांक), कृपा अनिल पेडणेकर इ. १०वी ( तृतीय क्रमांक), आर्या सतीश सावंत इ. १२ वी( चतुर्थ क्रमांक), मुक्ती अमृत भातकांडे इ. ९वी ( पंचम क्रमांक), तन्वी संतोष कांबळे इ. १०वी (षष्ठ क्रमांक)
१७ वर्षाखालील मुले-
ऑस्टीन विनुस डिसोझा इ. ९वी ( प्रथम क्रमांक)
१९ वर्षाखालील मुली –
परिणिता विजय गावकर इ. १२वी (द्वितीय क्रमांक), पायल पांडुरंग मेस्त्री इ. १२वी (तृतीय क्रमांक), ऋतुजा दिपक पेडणेकर इ. १२वी ( पंचम क्रमांक), चैताली शरद ठाकूर इ. ११वी (षष्ठ क्रमांक)
१९ वर्षाखालील मुले –
तेजस संदीप पवार इ. १२वी (प्रथम क्रमांक), साहिल संदीप सावंत इ. १२वी (द्वितीय क्रमांक), सुजय संदेश रणसिंग इ. १२वी (तृतीय क्रमांक), आर्यन सुनील तोरसकर इ. १२वी (पंचम क्रमांक)
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची जिमखाना सावंतवाडी येथे होणार असलेल्या जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत यांनी केले. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून प्रशालेचे संस्कृत अध्यापक तसेच पंच श्री. मकरंद आपटे व तालुका कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी व प्रसिद्ध कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव यांनी काम पाहिले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क.ग‌.शि.प्र. मंडळ मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री‌. सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री. आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील संस्कृत व इंग्रजी विषय शिक्षक तसेच कॅरम पंच श्री. मकरंद आपटे, जिल्ह्यातील प्रसिद्ध खेळाडू श्री. गौतम यादव आणि क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!