*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले पोलिस ठाण्याच्या गणरायाचे दर्शन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
वेंगुर्ला पोलीस ठाण्यात पोलिसांच्यावतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणपतीचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी दर्शन घेतले. तर १७ दिवसांच्या या गणरायाचे रात्री पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिरवणुकीने मांडवी खाडी येथे गणरायाचे विसर्जन केले.
वेंगुर्ला येथे जनता दरबार कार्यक्रमासाठी पालकमंत्री नितेश राणे आले होते. त्यांनी आवर्जून वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे भेट देऊन पोलिसांच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष पप्पू परब तसेच साईप्रसाद नाईक, नामदेव सरमळकर, संतोष सावंत, दादा केळुस्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पालकमंत्री राणे यांचे स्वागत करून पोलीस ठाण्याच्यावतीने सत्कार केला. यावेळी पोलीस मनोज परूळेकर, पांडुरंग खडपकर, पालकर अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वेंगुर्ला पोलीस ठाण्यासमोर कार्यक्रमासाठी सभा मंडपाची आवश्यकता आहे, अशी मागणी यावेळी पोलिसांनी केली. त्यावर पालकमंत्री यांनी यासाठी अंदाजपत्रक तयार करून द्या त्यासाठी निधी मंजूर केला जाईल असे सांगितले.
फटोओळी – पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पालकमंत्री राणे यांचे स्वागत करून पोलीस ठाण्याच्यावतीने सत्कार केला.

