रत्नागिरीत जागतिक फिजिओथेरपी दिन उत्साहात साजरा: निरोगी वार्धक्य यावर विशेष भर

रत्नागिरीत जागतिक फिजिओथेरपी दिन उत्साहात साजरा: निरोगी वार्धक्य यावर विशेष भर

*कोंकण एक्सप्रेस*

*रत्नागिरीत जागतिक फिजिओथेरपी दिन उत्साहात साजरा: निरोगी वार्धक्य यावर विशेष भर*

*_रत्नागिरी_* :

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट (IAP) आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट वुमेन्स सेल (IAPWC), तसेच एस.एम. जोशी फिजिओथेरपी महाविद्यालय आणि वालावलकर फिजिओथेरपी महाविद्यालयाने संयुक्तपणे जागतिक फिजिओथेरपी दिन म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी ‘हेल्दी एजिंग’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत, आंतर-महाविद्यालयीन ‘रील मेकिंग’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांनी ‘हेल्दी एजिंग’ या विषयावर आकर्षक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवले. या स्पर्धेतील विजेत्यांना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनने रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.

याशिवाय, एस.एम. जोशी कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी शिरगावमधील वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवला. त्यांच्यासाठी विविध खेळ आणि मजेदार उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. जुई मुकादम यांनी ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाचे महत्त्व प्रात्यक्षिकांतून समजावून सांगितले ज्याचा फायदा त्यांना दैनंदिन जीवनात निश्चित होईल.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन च्या पदाधिकाऱ्यांनी सर्व उपस्थित फिजिओथेरपिस्टचा क्लबच्या वतीने सन्मान केला.

हा संपूर्ण कार्यक्रम इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट महाराष्ट्र शाखेचे डॉ. उज्ज्वल येवले, डॉ. अमित गिरे, डॉ. दर्शना जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संदीप करे (IAP संयोजक), डॉ. अंजली गोगटे (IAP सचिव), डॉ. अस्मा शर्मा (IAPWC जिल्हा समन्वयक), डॉ. जुई मुकदम (IAPWC जिल्हा उप-समन्वयक), डॉ. एल. चंद्रशेखर (कार्यकारी समिती सदस्य), डॉ. करण कर्रा (कार्यकारी समिती सदस्य), डॉ. जाई कदम आणि डॉ. सत्यजित कुंभार (कार्यकारी समिती सदस्य) यांनी विशेष परिश्रम घेतले.

येणाऱ्या काळात असोसिएशन तर्फे अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील असा मानस यानिमित्ताने सर्वांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!