*कोंकण एक्सप्रेस*
*ठाकर समाजाची पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली सदिच्छा भेट, समाजाचे प्रश्न सोडवल्याबद्दल मानले आभार*
*जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुढाकार*
*मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत प्रलंबित प्रश्न मार्गी*
*समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक गरजांना चालना*
*सहकार्य आणि पाठबळाबद्दल ठाकर समाज ऋणी*
मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. मंत्रालय पातळीवर बैठक आयोजित करून समाजाच्या सुविधांबाबत असलेले अनेक मुद्दे सोडवल्याबद्दल नामदार नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले.
या भेटीत ठाकर समाज अध्यक्ष शशांक आटक व पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी समाजासाठी जात वैधता पडताळणी मिळवून देण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल मंत्री राणे यांचे आभार मानले.
यावेळी विद्यार्थ्यांना वेळेत जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यावर चर्चा करण्यात आली. भेटीला समाजातील पद्मश्री परशुराम गंगावणे, अध्यक्ष शशांक आटक, सचिव रुपेश गरुड, निलेश ठाकूर, वैभव ठाकूर, प्रवीण ठाकूर, अविनाश गरुड व अविराज मराठे उपस्थित होते.
यापूर्वी आदिवासी विकास मंत्री प्रोफेसर (डॉ.) अशोक रामाजी उईके यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे नेते व कार्यकर्ते यांनी मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रलंबित प्रश्नांवर बैठक घेतली होती. या बैठकीमुळे ठाकर समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागले होते.
ठाकर समाजाने दिलेल्या आभार पत्रात म्हटले आहे की, नितेश राणे यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणीसह शैक्षणिक, सामाजिक व विकास कामांत मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे समाजाच्या अडचणी सोडविण्यास मदत झाली असून पुढील काळातही सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.