रद्द करा रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा

रद्द करा रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा

*कोंकण एक्सप्रेस*

*‘रद्द करा रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा‘*

*वेंगुर्ला उबाठातर्फे आंदोलनानंतर तहसिलदार यांना निवेदन*

*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*

केंद्र व राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा लागू करून जनतेला आपल्या हक्कापासून डावलण्याचा घाट घातला आहे. याच्याविरोधात आज वेंगुर्ला येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिका-यांनी आंदोलन जनसुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत तहसिलदार यांना निवेदन दिले. या आंदोलनादरम्यान ‘रद्द करा रद्द करा जनसुरक्षा कायदा रद्द करा‘ अशा घोषणा दिल्या.
आज सरकारची भूमिका ही जनतेच्या विरोधात आहे. शेतक-यांना आणि सर्वसामान्यांना तसेच कष्टक-यांना रस्त्यावर आणण्याची भूमिका सरकारची आहे. जनतेला न्याय देण्यासाठी आणि हक्कासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरत असते. यापुढेही ज्या ज्या वेळी जनतेवर अन्याय होईल, त्या त्या वेळी शिवसेन जनतेच्या हक्कासाठी लढणार असल्याचे उबाठाचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी सांगितले.
यावेळी उपतालुकाप्रमुख संजय गावडे, उमेश नाईक, वसंत साटम, सुहास निकम, तुळस विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, माजी नगरसेवक तुषार सापळे, उपशहर प्रमुख शैलेश परूळेकर, युवा सेना शहर प्रमुख सुयोग चेंदवणकर, उभादांडा महिला उपसंघटक लक्ष्मी पेडणेकर, उभादांडा ग्रामपंचायत सदस्य नम्रता कुर्ले, राजश्री मर्ये, शाखाप्रमुख अभिमन्यू भुते, अनंत मांजरेकर, राजाराम साटम, मकरंद गोंधळेकर, गजानन गोलतकर, आसोली उपसरपंच विकी केरकर, श्रीधर पंडित, आनंद पेडणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
जनसुरक्षा कायदा लागू केल्या उबाठातर्फे उग्र आंदोलन छेडणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन निवासी नायब तहसिलदार राजन गवस यांनी स्वीकारले.
फोटोओळी – जनसुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत वेंगुर्ला उबाठातर्फे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!