*कोंकण एक्सप्रेस*
*नगर वाचनालयाच्या पुरस्कारांचे १४ सप्टेंबर रोजी वितरण*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेले आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण रविवार दि.१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे.
यावेळी विनोद मेतर (कोचरे-मायणे शाळा), तेजस बांदिवडेकर (वजराट नं.१), निशा वालावलकर (बावडेकर विद्यालय, शिरोडा) या शिक्षकांना तसेच भटवाडी शाळा नं.१ या शाळेला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आणि माजी मुख्याध्यापक सत्यवान पेडणेकर यांच्या हस्ते आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी यावचेळी उपस्थित रहावे असे आवाहन नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.