*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*
*सिंधुदुर्गनगर*
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार 11 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवारी दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून जयगडकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता जे.एस. डब्ल्यु, जयगड पोर्ट लि. या कंपनीचे अधिकारी आणि काजू महामंडळाच्या संचालकांची बैठक (स्थळ:- जयगड पोर्ट, जयगड जि. रत्नागिरी). सकाळी 9.45 वाजता भारतीय जनता पार्टी, विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनास उपस्थिती ( स्थळ:- कोठावडे बाजारपेठ, भाजपा विभागीय कार्यालय, रत्नागिरी). सकाळी 10 वाजता मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान कार्यक्रमास उपस्थिती ( स्थळ:- इच्छापूर्ती मंगल कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग).