*कोंकण एक्सप्रेस*
*खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मध्ये 11 वी पटसंख्या वाढविण्यासंदर्भात उपसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर यांना दिले निवेदन*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
या वर्षी इ 11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने रत्नागिरी – सिंधुदुर्ग मधील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. खारेपाटण येथील शेठ न म विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये राजापूर ,वैभववाडी , कणकवली ,देवगड , आदि तालुक्यातील ग्रामीण डोंगराळ भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .मात्र या वर्षी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलें गुण असूनही दूरवरचे कॉलेज निवडावे लागते, इथे ये -जा करणे सोयीचे नाही आणि अधिकचा आर्थिक भार पालकांवर पडल्याने विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेणे शक्य होत नाही असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे .असे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या करीता खारेपाटण ज्युनिअर कॉलेज ला असलेली 80ही तुकडीची पटसंख्या वाढवून 120 मिळावी व अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा या करीता प्राचार्य श्री संजय सानप व पालक यांच्या विनंती नुसार शिवसेना तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव यांनी तत्काळ दखल घेत पालकमंत्री नितेशजी राणे व राजापूरचे आमदार श्री किरण भैया सामंत यांच्या कानावर घातले.
त्यांच्या मार्गदर्शन नुसार विद्यार्थ्यांना स्थानिक कॉलेज मध्ये प्रवेश मिळावा यासाठी वर्गाची पटसंख्या वाढवावी वा नवीन तुकडीला मान्यता द्यावी अशा स्वरूपाचे निवेदन खा प शि प्र मंडळाच्या वतीने श्री मंगेश गुरव यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक श्री चौथे साहेब यांना सदर करण्यात आले. या प्रसंगी कृषी उत्पन्न समितीचे श्री मंगेश ब्रम्हदंडे ,संस्थेचे श्री यशवंत रायबागकर सर उपस्थित होते.
*तसा प्रस्ताव तातडीने सादर करा त्याला मान्यता देऊ असे आश्वासन श्री चौथे यांनी दिले* .
या करीता पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे तसेच आमदार श्री किरण भैया सामंत यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचे व श्री मंगेश गुरव यांचे आभार संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे व सेक्रेटरी श्री महेश कोळसुलकर यांनी व्यक्त केले .