*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे केले अभिनंदन*
*जिल्ह्यातील विविध प्रश्न समस्यांबाबत झाली चर्चा*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्न, जिल्हावासीयांना उद्भवणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.तसेच उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सदर प्रश्न व समस्यांचा आढावा घेऊन ते मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर,माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बंडू ठाकूर, अतुल बंगे, अवधूत मालणकर, बाळू पालव, सिद्धेश राणे, अमित राणे, संजय रावले, आप्पा मांजरेकर, समीर परब, श्री सावंत आदि उपस्थित होते.