*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे ९ सप्टेंबर रोजी संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे प्रतिवर्षाप्रमाणे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीचे पूजन करण्यात आले असून यानिमित्त मंगळवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. तसेच याचदिवशी सायंकाळी ६ वाजता ‘क्रोध शंभूचा वध झाला सूर्याचा – आरंभ गज स्वरूपाचा‘ हा पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
या नाट्यप्रयोगात दत्तप्रसाद शेणई, बाबा मयेकर, बंटी कांबळी, मामा माळकर, सागर गांवकर, प्रसाद शिरोडकर, उदय मोर्ये, निळकंठ सावंत, महेंद्र कुडव, प्रशांत मयेकर, केशव खांबल आदी कालाकार भूमिका साकारणार आहेत. तर यांना संकेत कुडव, किसन नेमळेकर व विनायक चव्हाण हे संगीतसाथ करणार आहेत. भाविकांनी तीर्थप्रसादाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला पोलिसठाण्यातर्फे करण्यात आले आहे.