*कोंकण एक्सप्रेस*
*केसरकर मित्रमंडळाचे गुरुसेवा सन्मान पुरस्काराचे मानकरी दिपक राऊळ*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील *श्री दिपकभाई केसरकर* मित्रमंडळातर्फे प्रतिवर्षी *शिक्षक दिन* चे औचित्य साधून *05 सप्टेंबर* रोजी *गुरुसेवा सन्मान पुरस्कार* देऊन गुणवंत शिक्षकांचा सन्मान केला जातो.
*सन 2025* ( यावर्षी ) पुरस्काराचे सलग *12* वे वर्ष असून विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना *सन 2025* चे पुरस्कार जाहीर झाले आहेत.प्रत्येक तालुक्याचे एक *प्राथमिक* आणि एक *माध्यमिक* शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.या पुरस्काराचे स्वरूप *सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व ग्रंथभेट* असे आहे.
*गुरुसेवा सन्मान पुरस्कार* चे मानकरी सावंतवाडी तालुक्यातील *जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तिरोडा नं 01* चे पदवीधर शिक्षक *सन्माननीय श्रीयुत दिपक जगन्नाथ राऊळ * यांची निवड झाली असून तसेच तिरोडा शाळेचे नाव अवघ्या सावंतवाडी तालुक्यात नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोशन केल्याबद्दल त्यांचे *शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी पालक संघ, शाळा विद्यार्थी विकास, भौतिक सुविधा समिती व ग्रामस्थ तिरोडा* यांच्या वतीने कौतुक होत आहे.